Contact : +123 456 789

/

E-mail : support@gutenify.com

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जनावरांना मिळणार हक्काचा निवारा व यंत्र खरेदीसाठी तब्बल एवढे अनुदान

यंत्र खरेदीसाठी अनुदान

ग्रामीण भागात शेतीसोबत मोठ्या प्रमाणात जोडव्यवसाय केला जातो. यामध्ये कुक्कुटपालन, पशुपालन, मत्स्यपालन, शेळीपालन या व्यवसायांचा समावेश होतो. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न भेटते. सरकार सुद्धा असे व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदाने व योजना जाहीर करून प्रोत्साहन देते.

पशुसंवर्धन विभाग योजना
मध्यंतरी सरकारने पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे ‘मनरेगा’त अभिसरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता पशुसंवर्धन विभागाच्या योजना ‘मनरेगा’द्वारे एकत्र राबविण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन
यामध्ये दुधाळ जनावरांचे गट वाटप करणे, ठाणबंद पद्धतीने शेळी, मेंढी पालन व्यवसायासाठी मेंढ्याचे गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पालन व्यवसाय यांचा समावेश होतो. या योजनेमुळे अनेक अल्पभूधारक व दारिद्य्ररेषेखालील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.

बंदिस्त पशुपालन होत नाही
यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास व राहणीमान उंचावण्यास मदत होते. असा निष्कर्ष राज्य शासनाने काढला आहे. मात्र, या योजनेंतर्गत गाय, म्हैस, मेंढी- शेळी गटांचे वाटप केलेल्या लाभार्थ्याकडून बऱ्याचदा बंदिस्त पशुपालन होत नाही. यामुळे त्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नाही.

जनावरांना पौष्टिक आहार मिळत नाही.
या जनावरांना बहुतेक ठिकाणी मोकळ्या रानात सोडले जाते. यामुळे त्यांना पौष्टिक आहार मिळत नाही. तसेच जंताचा प्रादुर्भाव वाढून दुधाचे प्रमाणे कमी होते. याशिवाय दुधात आवश्यक फॅटसही नसल्याने दुधाला योग्य दर मिळत नाही. असे निष्कर्ष राज्य शासनाने काढले आहेत. बहुतेक वेळा शेळ्या- मेंढ्यांना चाऱ्यासाठी भटकंती केल्याने पौष्टिक आहार मिळत नाही.

बंदिस्त पशुपालन
यामुळे शेळ्या मेंढ्यांचे वजन योग्य प्रमाणात वाढत नाही आणि त्यांच्यात जंत प्रादुर्भाव वाढत आहे. म्हणून मनेरगा अंतर्गत आता बंदिस्त पशुपालन केले जाणार आहे. ‘मनेरगा’ मधून पशुसंवर्धनाच्या योजनेला गती देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या विविध सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी कोणती ना कोणती योजना उपलब्ध करून देते. याचा फायदा शेतकऱ्यांना शेती उपयोगी कामात होताना दिसतो. या मशिनद्वारे कमी प्रमाणात पाऊस, अधिक प्रमाणात पाऊस, पावसाचा खंड असेल तरीही बीबीएफ (BBF) यंत्राद्वारे शेतीचे काम उत्तमोत्तम होताना दिसते. या योजनेच्या माध्यमातून हे यंत्र खरेदीसाठी किती अनुदान लागेल याबाबत माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.

बीबीएफ यंत्र योजनेद्वारे मिळणार एवढे अनुदान
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येणार आहे. अशातच मूळ यंत्राच्या किंमतीतून ५० % दरात सूट मिळेल. यासाठी हा अर्ज करायचा असेल तर www. mahadbt.Com या लिंकवर जाऊन आपण अर्ज भरू शकता.

उद्दिष्टे
रूंद वाफा व सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व पिकाच्या उत्पादकतेत वाढ करण्यास मदत करणे.
अधिक पाऊस झाल्यास किंवा कमी वेळेत अधिक पाऊस झाल्यास त्याचा निचरा अतिशय योग्य प्रकारे करण्यास मदत होते यामुळे अधिक पावसात पाणी साचून पिकांचे होणारे नुकसान टाळता येते.यंत्राचा वापर केल्यामुळे पेरणीसाठी कमी वेळ लागतो. योग्य प्रकारे दोन ओळीतील अंतर ठेवल्यास आंतरमशागतही करता येते. त्याचप्रमाणे या यंत्राचा लाभ मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज करून मिळवा या योजनेचा लाभ
इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या www. MahaDBT.com संकेतस्थळावर समूह सहाय्यकाच्या मदतीने नोंदणी करून अर्ज करावा, तसेच आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.
पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत सदर घटकाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

One response to “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जनावरांना मिळणार हक्काचा निवारा व यंत्र खरेदीसाठी तब्बल एवढे अनुदान”

 1. सर मी सुध्दा होता प्रकल्प सुरू करू इच्छितो…
  15 लाख परीयंत cast -sc

  Vikas pandurang kamble
  AP/bastwade.
  kagal.
  Kolhapur
  mo 8055273262.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *